Trauma Care Centre

PBC (Post Burn Contructure)

जेंव्हा सांध्यावर (Joints) खोल भाजले जाते आणि त्यावर योग्य उपचार झाले नाहीत किंवा रुग्णांनी व्यवस्थीत केला नाही तर या सांध्याच्या भागावरील जखम भरत असताना सांधा आखडला जातो. यावर उपचारामध्ये सर्जरी हा एकच पर्याय असतो. यामध्ये आखडलेला सांधा सोडवला जातो व त्यावर त्वचा रोपण किंवा Flap Cover केले जाते. बऱ्याचवेळा मानेवर जेंव्हा भाजले जाते तेंव्हा ती मान छातीला चिकटली जाते किंवा गळ्याचा भाग छातीला चिकटला जातो. PBC Neck (भाजल्यामुळे चिकटलेली मान सर्जरीने पूर्ववत करण्यात आली)

PBC Axilla (भाजल्यामुळे चिकटलेले खांदा सर्जरीने पूर्ववत करण्यात आली)

PBC Hand (भाजल्यामुळे चिकटलेले हाताची बोटे सर्जरीने पूर्ववत करण्यात आली)

Reconstructive Rhinoplasty (Forehead Flap)

बऱ्याचवेळा अपघाताने किंवा अन्य कारणाने नाकाचा कांही भाग तुटला जातो किंवा पूर्णपणे निकामी होतो अशा वेळी नाकाची पुनर्बांधणी वेगवेगळे Flaps वापरून करता येते.

Facial Injuries (अपघाताने झालेल्या चेहऱ्यावरील जखमा)

चेहऱ्यावर अपघाताने किंवा अन्य कारणाने जेव्हा जखम/जखमा होतात तेव्हा त्यावर ताबडतोब योग्य उपचार करणे (त्यावर लगेच सर्जरी करणे) अत्यंत जरूरीचे असते. फाटलेला भाग पूर्ववत त्याच जागेवर बसवणे (Anatomical Repair) महत्त्वाचे असते तसेच तुटलेल्या नसा लगेच जोडणेही तेवढेच आवश्यक असते. हे उपचार जखम झाल्यापासून १२ ते २४ तासाच्या आत झाले नाहीत तर चांगले रिझल्ट मिळत नाहीत. म्हणूनच आमच्या प्लास्टीक सर्जरी ट्रेनींगमध्ये शिकवले जाते की Primary Repair is the best repair and The first time is the best time जखमा कितीही मोठ्या असतील तरी या खूप छान Repair करता येतात. फक्त त्यावर योग्य वेळेत व योग्य तज्ञांकडून उपचार करून घेणे जरुरीचे असते.

Groin Flap

पांढरे चट्टे, बर्थ मार्क्स (जन्म खुणा) : शरीरावर पांढरे चट्टे पडण्यामागे अनेक कारणे असतात पण प्रमुख कारण म्हणजे पांढरा कोड. भाजल्यानंतर, मार लागल्यानंतरही असे चट्टे पडू शकतात. ‘मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट’ हा या चट्ट्यावरील पहिला ईलाज आहे. जेव्हा मेडिसीन वापरुन ते कमीच होत नाहीत आणि आहे तेवढेच राहतात. वाढत पण नाहीत (स्टेबल पॅचेस) म्हणजे तीन वर्ष वाढले नाही आणि कमीही झाले नाहीत अशा पांढऱ्या चट्ट्यावर प्लास्टीक सर्जरी करून ते पूर्णपणे बरे करता येतात. यामध्ये पांढऱ्या भागावरील त्वचेचे पांढरे पडदे मशिनने काढले जातात आणि त्यावर दुसरीकडील चामडी काढून बसवली जाते. नवीन लावलेल्या चामडीचा रंग वेगळा दिसतो. पण हे प्रमाण वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगळे आहे. हे मॅच होण्यासाठी तीन महिन्यापासून एक वर्षापर्यंतचा कालावधी लागतो.

Posterior Interosseous Artery Flap

या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी झालेल्या जखमा ज्या खोल असतात व ज्यामुळे नसा, हाडे उघडे पडलेली असतात, यांना कव्हर करण्यासाठी वापरतात. ह्या Flap ची Feeding Artery खोल असल्याने तिला शक्यतो ईजा होत नाही त्यामुळे हा Flap एक प्रकारचे पक्के कव्हर म्हणून वापरले जाते.

Reverse Sural Artery Flap

पायाच्या Ankle Joint च्या वर आणि खाली तसेच Heal या ठिकाणी जेंव्हा जखमा होतात व त्या खोलवर असतात, खालच्या नसा किंवा हाडे उघडी होतात तेव्हा R.S.A.Flap करुन त्या Cover करता येतात. हा Flap एक Life Board म्हणून वापरला जातो. जेथून आपण हा Flap काढतो तेथे कांही विशेष व्यंग होत नाहीत तसेच या Flap मध्ये एक चेतातंतूची नसही काढली जाते परंतू त्यामुळे सुध्दा खूप जास्त व्यंग तयार होत नाहीत.

Hand Injury

अनेक कारणांनी बोटांना जखमा होतात मानवी शरीरात सर्वात जास्त जखमा होणारा भाग म्हणजे हाताची बोटे . वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मशीनबरोबर काम करताना तसेच स्वयंपाक घरात काम करताना बोटांना जखमा होत असतात. शेतात, कारखान्यात, कन्स्ट्रक्शनवर काम करताना ह्या जखमा छोटी चामडी निघण्यापासून ते पूर्ण बोटे कापली जाण्यापर्यंत असू शकतात ह्या जखमांमध्ये, बोटावरची पूर्ण चामडी निघून जावू शकते बोटांची कामे करणाऱ्या नसा, रक्तवाहिन्या व चेतातंतू हे पण कापली जावू शकतात, अनेकवेळा हाडांचे फ्रॅक्चर्स होतात. हाताची बोटे हे मानवाच्या कार्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे आणि यालाच अशा मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या तर तो माणूस अनेक कार्यापासून दूर राहू शकतो. म्हणून या जखमांवरती योग्य वेळेत योग्य उपचार होणे जरुरीचे असते. प्लास्टीक सर्जरीमध्ये Hand Surgury ही एक स्वतंत्र ब्रँच निर्माण झाली आहे. यामध्ये Hand रिकन्स्ट्रक्शन हा अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. ह्या सगळ्या प्रकारच्या फिंगर इंज्युरीज योग्य त्या उपचाराने दुरुस्त केल्यानंतर हाताचे कार्य पूर्ववत आणता येते. यामध्ये Flap cover, Tendon Repair, Neurovascular bundle Repair and Fracture Fixation महत्वाचे असते.

Microvascular Surgery

यामध्ये तुटलेल्या नसा Microvascular Surgery च्या साहाय्याने जोडल्या जातात. तसेच शरीरातील एक भाग काढून (नसांसह) आवश्यक त्या ठिकाणी जोडला जातो. (उदा. पायाचे बोट हाताला जोडणे, मांडीचा स्नायू चेहऱ्याला जोडणे इत्यादी.) ही सर्जरी अत्यंत गुंतागुंतीची असते. ही सर्जरी करण्यासाठी दोन तासापासून साधारणत: १८ ते २४ तास वेळ लागतो.