About Us

आमच्याविषयी

एमसीएच प्लास्टिक सर्जरी ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी ग्रँड मेडिकल कॉलेज व जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई येथून संपादन केल्यानंतर प्रॅक्टिस साठी लातूरची निवड दोन कारणासाठी केली पहिले माय व अण्णा आमचे आई-वडील यांच्याजवळ राहता येईल आणि दुसरे म्हणजे प्लास्टिक सर्जरी श्रीमंताचीच ब्रांच आहे असे जे संकल्पना आहे ती बदलून सर्वसामान्यांना सुद्धा प्लास्टिक सर्जरी करून घेता यावी ही ब्रांच गरिबापर्यंत घेऊन जाता यावी या उद्देशाने प्रॅक्टिस साठी लातूरची निवड करण्यात आली. गेल्या 22 वर्षात हे मुख्य उद्देश अत्यंत समाधानकारकपणे पूर्ण करू शकलो यात खूप सुख आनंद व समाधान मिळाले मार्च 2000 मध्ये मुंबई सोडताना माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व माझे प्लास्टिक सर्जरीचे गुरु डॉक्टर बीएम डावर सर यांचे आशीर्वाद घेतले व त्यांना एक वचन दिले की मी शंभर टक्के इमानदारी प्रामाणिकपणे रुग्ण सेवा करीन मी माझ्या आयुष्यात असे काहीही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल याच तत्त्वावर गेले 22 वर्षे रुग्ण सेवा करत आहे या बावीस वर्षाच्या प्रवासात मी करत असलेली रुग्णसेवा माझे

आध्यात्मिक गुरु वैकुंठवासी ह भ प विठ्ठल प्रसाद महाराज धर्मापुरीकर यांच्या आशीर्वादाने माय व अण्णा यांच्या पुण्याईने मी मोठा व्हावा असे माझ्या लहानपणापासून ज्यांना वाटते ते माझे वडील बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने नेहमीच माझ्या विचाराला पाठिंबा देणारे व खांद्याला खांदा लावून मला मदत करणारी माझी पत्नी डॉक्टर सौ कल्पना लहाने वेळोवेळी मला खंबीर आणि मोलाचे साथ देणारे माझे मित्र भुलतज्ञ डॉक्टर राजेश शहा यांच्या सहकार्यामुळे प्रेमामुळे प्रेरणेमुळे होत आहे असे मी माझ्या मनातून हृदयातून नमूद करतो तत्त्वनिष्ठ इमानदारीची व प्रामाणिक प्रॅक्टिस करण्याच्या दह्याने मी लातूरमध्ये काम सुरू केले असे म्हणतात चांगले काम करणाऱ्याला चांगले साथ आणि हात पण मिळतात आणि माझ्या या प्रवासामध्ये असेच चांगले साथ व चांगले हात मला पण मिळाले या रुग्णसेवेच्या यज्ञात लहाने हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो त्या सर्वांचे मी रुग्णाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो मी आज पर्यंत जे तत्व अंगीकारून प्रॅक्ट िस करत आहे ते म्हणजे रुग्णाशी 100% प्रामाणिक राहून इमानदारीची सेवा देणे याच तत्वाने यापुढेही अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा देणार आहे या रुग्णसेवेसाठी मी स्वतः कटिबद्ध असल्याचे आपणास वचन देतो आपलाच डॉक्टर विठ्ठल पुंडलिकराव लहाने

Testimonials

Positive Review From Our Patients

“We always give our best treatment to satisfy your health”

जेव्हा जेव्हा आम्ही लहाने सरांना भेटलो तेव्हा तेव्हा आम्हाला असं वाटलं की कोणीतरी आपला माणूस आहे. आपल्या खूप जवळचा माणूस, कारण सर बोलताना असं बोलतात की परक्याची भावना येऊ देत नाहीत, सगळ्यांना आपले समजतात, सर खूप ग्रेट आहेत. सर्जरीनंतर मी स्वतःला आरशात पाहिलं आणि खूप आश्चर्य वाटले कारण मी खूप छान दिसत होते. त्या सर्जरीतून मला एक नवीन ओळख मिळाली आहे आणि या सगळ्या गोष्टीतून एक मात्र कळले की आयुष्य मला एका वेगळ्या पध्दतीने जगता येणार आहे.

- राजनंदनी विजयकुमार समुद्रे, बीड
लहाने सर सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो. मी आपल्याला भेटल्यापासून भरपूर प्रसन्न आहे ते म्हणजे तुमची काम करण्याची पध्दत बघून. एवढी ऊर्जा आपणास कोठून मिळते, असं मला वाटायचं पण त्याच उत्तर मला आपल्याकडे 9 दिवस राहिल्यानंतर समजले. तुमची पेशंट बरोबर वागण्याची पध्दत, त्यांची घेत असलेली काळजी आणि तुमची उपचार करण्याची पध्दत अत्यंत चांगली आहे. मला तुमच्याकडून आणि तुमच्या स्टाफ कडून मिळालेला प्रतिसाद मी आयुष्यात कधीच विसरु शकत नाही. तुमच्या स्टाफचे आम्ही आभारी आहोत.
गणेश गोविंद राऊळ, रायगड.
खरंतर मी मुंबईला नानावती हॉस्पिटल, पुणे येथे अटेस्टीक मेडस्पा कॉस्मेटिक लेझर सर्जरी सेंटर येथे जाऊन आली होती. काही दिवसानंतर लहाने हास्पिटल चे नाव मी प्रसारमाध्यमात पाहिले आणि डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे व्याख्यान युट्युबवर बघितले. गरिबीची जाणीव असलेले डाक्टर लहाने हे खरोखर पंढरपूरच विठ्ठलाचे रुपात आहेत. कमी खर्चात इतकी चांगली सर्जरी करणारे मला वाटते की भारतातील एकमेव डॉक्टर आहेत. असो सांगावे तितके कमी आहे. पण मला येथे आल्यानंतर खूप छान वाटले. सर्जरी पण खूप छान झाली.
- ज्योती संतोष कांडेकर, नाशिक

Our Services

What Lahane Hospital Offer

Plastic Surgery

Plastic surgery is a surgical specialty involving the restoration, reconstruction or alteration of the human body.

Cosmetic Surgery

Cosmetic surgery is where a person chooses to have an operation, or invasive medical procedure

Reconstructive Surgery

Reconstructive surgery is a procedure that restores your body after an injury, after a disease, or it corrects defects you were born with.

Hand Surgery

Hand surgery deals with both surgical and non-surgical treatment of conditions and problems that may take place in the hand.

Burn Care Centre

It's important to keep the area covered with cotton clothing. If the burn or scald is on your face.

Dental Clinic

A dental clinic ordinarily provides basic dental services, such as checkups, fillings and root canals.

Trauma Care Centre

A trauma center is a hospital equipped and staffed to provide care for patients suffering from major traumatic injuries.

Cleft Care Centre

Surgery restores normal function with minimal scarring. If required, speech therapy helps correct speaking difficulties.

Speech Therapy

Speech therapist or speech-language pathologists are trained personnel who work with children having speech-related disorders.

Physiotherapy

Physical therapy, also known as physiotherapy, is one of the allied health professions. It is provided by physical therapists who promote, maintain.

Our Contacts

Get In Touch

We, here at Lahane Hospital constitute a fully devoted team ever ready for a new challenge.

VISIT US

Dinanath Nagar Savewadi, Latur, Maharashtra 413531

EMAIL US

vlahane@gmail.com

CALL US

(02382)254406, 258880

FOLLOW US

Opening Hours

Visit Our Hospital

Lahane Hospital near Diwanji Function Hall, Dinanath Nagar Savewadi has a wide range of products and / or services to cater to the varied requirements of their customers. The staff at this establishment are courteous and prompt at providing any assistance. They readily answer any queries or questions that you may have. Pay for the product or service with ease by using any of the available modes of payment, such as Cash. This establishment is functional from 00:00 – 23:59.

Monday – Friday

Saturday

Sunday