Feedback

Testimonials

Positive Review From Our Patients

“We always give our best treatment to satisfy your health”

जेव्हा जेव्हा आम्ही लहाने सरांना भेटलो तेव्हा तेव्हा आम्हाला असं वाटलं की कोणीतरी आपला माणूस आहे. आपल्या खूप जवळचा माणूस, कारण सर बोलताना असं बोलतात की परक्याची भावना येऊ देत नाहीत, सगळ्यांना आपले समजतात, सर खूप ग्रेट आहेत. सर्जरीनंतर मी स्वतःला आरशात पाहिलं आणि खूप आश्चर्य वाटले कारण मी खूप छान दिसत होते. त्या सर्जरीतून मला एक नवीन ओळख मिळाली आहे आणि या सगळ्या गोष्टीतून एक मात्र कळले की आयुष्य मला एका वेगळ्या पध्दतीने जगता येणार आहे.

- राजनंदनी विजयकुमार समुद्रे, बीड
  लहाने सर सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो. मी आपल्याला भेटल्यापासून भरपूर प्रसन्न आहे ते म्हणजे तुमची काम करण्याची पध्दत बघून. एवढी ऊर्जा आपणास कोठून मिळते, असं मला वाटायचं पण त्याच उत्तर मला आपल्याकडे 9 दिवस राहिल्यानंतर समजले. तुमची पेशंट बरोबर वागण्याची पध्दत, त्यांची घेत असलेली काळजी आणि तुमची उपचार करण्याची पध्दत अत्यंत चांगली आहे. मला तुमच्याकडून आणि तुमच्या स्टाफ कडून मिळालेला प्रतिसाद मी आयुष्यात कधीच विसरु शकत नाही. तुमच्या स्टाफचे आम्ही आभारी आहोत.
  गणेश गोविंद राऊळ, रायगड.
  खरंतर मी मुंबईला नानावती हॉस्पिटल, पुणे येथे अटेस्टीक मेडस्पा कॉस्मेटिक लेझर सर्जरी सेंटर येथे जाऊन आली होती. काही दिवसानंतर लहाने हास्पिटल चे नाव मी प्रसारमाध्यमात पाहिले आणि डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे व्याख्यान युट्युबवर बघितले. गरिबीची जाणीव असलेले डाक्टर लहाने हे खरोखर पंढरपूरच विठ्ठलाचे रुपात आहेत. कमी खर्चात इतकी चांगली सर्जरी करणारे मला वाटते की भारतातील एकमेव डॉक्टर आहेत. असो सांगावे तितके कमी आहे. पण मला येथे आल्यानंतर खूप छान वाटले. सर्जरी पण खूप छान झाली.
  - ज्योती संतोष कांडेकर, नाशिक
  आदरणीय लहाने सर तुम्ही खरोखर देव माणूस आहात. कारण मी आत्तापर्यंत फक्त ऐकून होते. पण आता प्रत्यक्ष तुम्हाला जवळून पाहता आलं. तुम्ही जसं बोलता तसेच वागता याचा मला अनुभव आला. सर एक सांगू का मला तुम्ही एक नवीन आकार दिलात. माझ्यातला तुम्ही आत्मविश्वास वाढवलात. सर तुमचा स्टाफ अतिशय प्रेमळ, नम्र मनमिळावू कष्टाळू व सर्वात जास्त वक्तशीरपणा आहे. हॉस्पिटलची शिस्त छान आहे.
  अश्लेशा अशोक कांबळे, परभणी
  सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो. सर आपण माझ्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठलाचे रुप आहात. येथे राहिलेल्या दिवसात माझ्या आयुष्यात पुरेल एवढी शिकवणी मिळाली. आपली रुग्णासोबत संवाद साधण्याची पध्दत, दिवस-रात्र न थकता काम करणे, इतकी मेहनत करुन पद, प्रतिष्ठा, पैसा मिळवला पण जमिनीशी असलेली नाळ कायम आहे. ऑपरेशन करायचा विचार मी दोन वर्षापासून करत होतो, परंतु जमत नव्हते. एक मात्र ठरलेले होते, ऑपरेशन फक्त लहाने सरांकडेच करायचे. इथल्या एका आठवड्याने मला माझ्या जीवनाचा मार्ग मिळाला. तुम्ही राऊंडला येईपर्यंत जिवाला चैन पडायची नाही. कधी एकदा तुमची प्रसन्न मुद्रा पाहतोय असं वाटायचं. वॉर्डामध्ये मला एकच काम होतं आपल्या राऊंडची वाट पाहणे.
  - डॉ. राहुल विठ्ठल मुंडे, बीड
  आयुष्यभर जे स्वप्न पाहिले, ते आज साकार झाले. त्यामुळे आनंदाश्रू निघाले. तुम्ही सर्जरी केलेल्या मुली तुम्हाला लग्नाचे कार्ड पाठवतात पण मी तुम्हाला रक्षाबंधनाचे कार्ड पाठवीन.
  - सुनिता जोशी, औरंगाबाद.
  लहाने सर यांना माझा मानाचा मुजरा. मी दोन वर्षाच्या अथक प्रयत्नांनी आता नाकाची शस्त्रक्रिया करून घेतली. तुमच्याबद्दल पुढे लिहीन, परंतु आपल्या हॉस्पिटलमधील स्टाफ खरोखर अतिशय प्रेमळ, मनमिळावू आहेत. तसेच त्यांची वागण्या बोलण्याची भाषा अतिशय समंजस आहे. स्वच्छता, लाईट, पाणी आमच्या स्वतःच्या घरी पण अशा स्वरुपाची सोय नाही. आपल्या स्टाफचा मी मनापासून ऋणी आहे.
  - शिवाजी सुब्राव काकडे (पाटील), उस्मानाबाद
  आठ दिवस राहिले परंतु हॉस्पिटलमध्ये राहिल्या सारखं जाणवलं नाही. घरामध्ये राहिल्या सारखं जाणवलं.
  - विजया लक्ष्मण पवार, नांदेड
  मी बाळाच्या आईची सोनोग्राफी सातव्या महिन्यात केली होती बाळाला ओठ आणि टाळू फाटलेले आहे हे मला डॉक्टरांनी सांगितले होते, आणि काही जणांनी अबोर्शन करून घेण्याचा सल्ला दिला होता. पण मला माझं बाळ हवं होतं. तेव्हा मी लहाने सरांना भेटण्यासाठी एकटाच आलो होतो. तेव्हा मला बाळाच्या आईला घेऊन येण्यास तुम्ही बजावले. मला व माझ्या बायकोला तुम्ही जेव्हा समजावून सांगितले तेव्हा एवढा आनंदी झालो होतो की मी शब्दात सांगू शकत नाही. तुमचं बाळ तुम्हा दोघा पेक्षा छान करून देतो हे तुमचे शब्द. आजचा तो दिवस आहे. बाळाची सर्जरी झाली आहे. माझं बाळ सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी सुंदर दिसत आहे. आदरणीय लहाने सर
  - सचिन काळे, बीड
  आपण माणसाच्या चेह-यावर हास्य फुलवणारे महान किमयागार आहात. हरवलेला आत्मविश्वास मिळवून देणारे थोर पुरुष आहात. खरंतर आपल्याबद्दल खूप ऐकलं होतं पण आजचा अनुभव अविस्मरणीय. माझ्या दिसण्यामध्ये आपण क्रांतिकारक बदल केला आहे. खरंतर जेव्हा-जेव्हा आरशात चेहरा पाहायचो नकोसं वाटायचं. पण आता आपण नेहमी नेहमी आनंदाने आरसा बघावा अशी परिस्थिती निर्माण केली आहे. आपण केलेली सर्जरी म्हणजे माझ्यावर आपले मरेपर्यंत असणारे उपकार आहेत. नेहमी आपल्या ऋणात राहू इच्छितो अंतकरणापासून धन्यवाद.
  - प्रा. (डॉ.) मिलिंद बनकर, औरंगाबाद
  दररोज हसत-हसत पेशंटला बोलणे, मायेचा आशीर्वाद रुपी हात डोक्यावर ठेवणे, निष्ठेने काम करणे, वेळेला खूप महत्त्व. उक्ती व कृती एकच. एक खांबी तंबू, एवढे मोठेपण की धन्य ती माऊली जिने तात्यांना व विठ्ठल सरांना जन्म दिला. दवाखान्याची वैशिष्ट्ये: पेशंट कडे विशेष लक्ष, मनमिळावू स्टाफ, स्वच्छता जिव्हाळा, चार्जेस कमी, सरांच्या हाताला यश व भव्य इमारत. सरांची काम करण्याची सचोटी वाखाणण्याजोगी आहे. थांबने हे माहीतच नाही. दिनचार्यास तोड नाही. ओपीडी, सर्जरी, राऊंड, दुभंगलेले ओठ व टाळू मोफत शस्त्रक्रिया. एवढा प्रचंड कामाचा ताण असतो, पण सर सतत हसतच पेशन्टकडे येतात, त्यांना प्रचंड आंतरिक ऊर्जा देतात, भविष्यातील अंधार नाहीसा करतात. याठिकाणी लहाने हॉस्पिटल हे रुग्णांना मिळालेले वरदानच म्हणावे लागेल. गरिबांना परवडेल असाच हा दवाखाना आहे. एकाच वृक्षाखाली एवढी पाखरे विसावतात, झोपतात, हसतात, रडतात येतात व हसत जातात.
  - विजय माने व शोभा माने, अहमदपूर.

  Our Contacts

  Get In Touch

  We, here at Lahane Hospital constitute a fully devoted team ever ready for a new challenge.

  VISIT US

  Dinanath Nagar Savewadi, Latur, Maharashtra 413531

  EMAIL US

  vlahane@gmail.com

  CALL US

  (02382)254406, 258880

  FOLLOW US

  Opening Hours

  Visit Our Hospital

  Lahane Hospital near Diwanji Function Hall, Dinanath Nagar Savewadi has a wide range of products and / or services to cater to the varied requirements of their customers. The staff at this establishment are courteous and prompt at providing any assistance. They readily answer any queries or questions that you may have. Pay for the product or service with ease by using any of the available modes of payment, such as Cash. This establishment is functional from 00:00 – 23:59.

  Monday – Friday

  Saturday

  Sunday