Speech Therapy

भाषा व उच्चार यांचे मार्गदर्शन (Speech Therapy) :

A) भाषा शिकविण्याविषयी माहिती :
• बाळासोबत जास्तीत जास्त बोलत राहणे. जरी तो प्रतिसाद देत नसेल तरीही आपण बाळासोबत जे काही बोलतो ते बाळाने बघणे, ऐकणे व समजून
घेणे आवश्यक असते. त्यानंतरच बाळ उच्चार करेल. • बाळासोबत नवीन नवीन खेळ खेळत राहणे जेणे करून बाळास उच्चार करण्यास प्रोत्साहन मिळेल. • जेव्हा आपला बाळ वेगवेगळे आवाज काढत असेल यावेळेस बाळाला थांबवू नये किंवा आपण मध्येच बोलू नये. • बाळाला वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज काढण्यास शिकविणे. • बाळाच्या कानाजवळ वेगवेगळे आवाज काढुन बाळाची ऐकण्याची क्षमता वाढवणे व बाळ ऐकत आहे की नाही याकडे सुध्दा लक्ष देणे. • बाळाला आपण जर का एखादा शब्द शिकवत असलो तर तो शब्द आपल्या मुखाद्वारे 50-60 वेळेस बाळाच्या कानावर पडणे आवश्यक आहे. त्यानंतर बाळाला उच्चार करण्यास प्रवृत्त करणे. • एका वहीमध्ये प्रत्येक पानावर फक्त दोन-दोन प्राण्यांचे, फळांचे, भाजीपाल्यांचे, गाड्यांचे, घरातील व्यक्तींचे, शरिरातील अवयवांचे चित्र चिटकवून बाळाला ते दररोज 1-2 तास समजावून सांगणे. दोनपेक्षा जास्त चित्र चिटकवल्यास तुम्ही जे सांगत आहात त्याकडे बाळाचे लक्ष राहणार नाही.


B) चुकीचे उच्चार दुरुस्त करून शिकविण्याची पध्दती :
• 3 ते 4 वर्ष वयानंतर आपण चुकीचे उच्चार दुरुस्त करून शिकविण्यास सुरुवात करू शकतो. • बाळाला जर प, ब, भ, म यांचा उच्चार व्यवस्थीत येत नसेल तर दोन्ही ओठ एकमेकांवर तंतोतंत जोडून उच्चार करण्यास शिकविणे. • ट, ठ, ड, ढ चा उच्चार व्यवस्थीत येत नसेल तर जिभेचा शेंडा टाळुच्या मध्यभागी चिटकवून उच्चारांचा सराव करण्यास सांगणे. • क, ख, ग, घ यांचा उच्चार व्यवस्थीत येत नसेल तर जिभेचा मागचा हिस्सा टाळुच्या मागच्या हिस्याला चिटकवून उच्चार करण्यास शिकविणे. • स, श यांचा उच्चार येत नसेल तर दोन्ही दात एकमेकांवर तंतोतंत बंद करून यांचा उच्चार शिकविणे.

डॉ. लहाने हे नेहमी म्हणत असतात आता मी दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मदोषावर पूर्ण आयुष्यभर मोफत सर्जरी करणार आहे. त्यांचा हा संकल्प पूर्ण होवो व अशा व्यंगाच्या मुलांना पुन्हा नवजीवन मिळो हीच ईश्वर
चरणी प्रार्थना. दररोज दोन ते
तीन रुग्णांवर सर्जरी

झालेल्या रुग्णांना सुट्टी हा कार्यक्रम नेहमीच चालू असतो. रुग्णांचे पालक अतिशय खुष व भावनिक झालेले असतात. डॉक्टरसाहेब आम्हाला देवाने असे व्यंग असलेले मूल दिले पण तुम्ही जादूच्या हाताने हे व्यंग पूर्णपणे दुरुस्त करून आमच्या बाळाला नवजीवन दिले. आता आपले ऋण कसे व्यक्त करावे तेच कळत नाही हे उद्गारच कामाची पावती व समाधान देऊन जातात.

Microtia (जन्मत: बाह्य कर्ण नसणे)
यामध्ये एक किंवा दोनही बाह्य कर्ण (External ear Pinna) जन्मत: पूर्णपणे किंवा अंशत: नसतो. कानाचे बाह्य छिद्र अनेक वेळा नसते तरीपण अशा रुग्णांना bony-conduction द्वारे बऱ्याच चांगल्या प्रमाणात ऐकायला येत असते अशा रुग्णांना ब-याच वेळा Facial Palsy असण्याची शक्यता असते. या व्यंगावर सर्जरी साधारणपणे १० वर्ष वय व ३५ किलो वजन असताना करता येते. यामध्ये Costal Cartilage चा वापर करुन कानाच्या आकाराची Frame तयार केली जाते. या फ्रेमचा वापर करून टप्याटप्यामध्ये बाह्य कर्ण तयार केला जातो. तयार केलेला बाह्य कर्ण हा दिसण्यासाठी इतर कानासारखाच दिसतो. इतर कानाच्या तुलनेने जाड असतो आणि आपल्याच शरीराचा भाग वापरुन तयार केल्यामुळे तो कायमस्वरुपी असतो. ज्या रुग्णांना सर्जरी नको असते त्यांना कृत्रिम (Plastic) चा बाह्य कर्ण बसविता येतो पण तो कायमस्वरुपी नसतो त्याला दररोज काढावे घालावे लागते.

T.M.J. Ankylosis
यामध्ये जन्मतः किंवा नंतरच्या काळात Tempero- Mandibular Joint Fuse होतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णास तोंड उघडता येत नाही. तसेच, Mandible (तोंडाचा खालचा जबडा) ची वाढ कमी होते व
चेहऱ्याचा पूर्णपणे आकार बदलतो. यावर सर्जरी हा एकमेव उपचार असतो. यामध्ये Fuse झालेला TMJ वेगळा करून त्या ठिकाणी नवीन सांधा (Joint) तयार केला जातो. यासाठी छातीची फासोळी व त्यावर कुर्चाचा (Costal Cartilage) काही भाग घेतला जातो. याचा वापर करून तसेच तयार केलेल्या सांध्याच्या मध्ये Temporal Fascia घातला जातो. छातीची फासोळी (Rib) Mandibale च्या Condyle व Angle ला फिक्स केली जाते.
अशा रुग्णांचे तोंड उघडत नसल्याने त्यांना भूल देणे अत्यंत जिकरीचे असते. Video Laryago Scope च्या साह्याने Intubation केले जाते. या सर्जरीने अशा रुग्णांचे तोंड पूर्णपणे उघडले जाते आणि पुढच्या आयुष्यामध्ये विशिष्ट प्रकारचा व्यायाम करावा लागतो. अशा रुग्णास नियमितपणे व्यायाम केल्याने पुढील आयुष्यात नॉर्मल तोंड उघडता येते.

Our Contacts

Get In Touch

We, here at Lahane Hospital constitute a fully devoted team ever ready for a new challenge.

VISIT US

Dinanath Nagar Savewadi, Latur, Maharashtra 413531

EMAIL US

vlahane@gmail.com

CALL US

(02382)254406, 258880

FOLLOW US

Opening Hours

Visit Our Hospital

Lahane Hospital near Diwanji Function Hall, Dinanath Nagar Savewadi has a wide range of products and / or services to cater to the varied requirements of their customers. The staff at this establishment are courteous and prompt at providing any assistance. They readily answer any queries or questions that you may have. Pay for the product or service with ease by using any of the available modes of payment, such as Cash. This establishment is functional from 00:00 – 23:59.

Monday – Friday

Saturday

Sunday