Plastic Surgery

1. Tissue expansion

हे टेक्नीक अनेक प्रोसिजरसाठी वापरण्यात येते. कॉस्मेटीक सर्जरी आणि रिकनस्ट्रक्टीव्ह सर्जरीमध्येही या टेक्नीकचा भरपूर फायदा होतो. या टेक्नीकच्या साह्याने चांगली त्वचा मोठी करता येते. यामध्ये एक बलून (Expander) एक्सपांडर चा वापर केला जातो. हे एक्सपांडर चांगल्या नॉर्मल चामडीच्या खाली टाकले जाते व त्यामध्ये नॉर्मल सलाईन भरले जाते. प्रत्येक आठ दिवसात एकदा असे नॉर्मल सलाईन भरले जाते व हे एक्सपांडर मोठे-मोठे होत जाते. जशी जशी या एक्सपांडर ची साईज वाढते तशी – तशी त्या नॉर्मल त्वचेचीपण साईज वाढते. जेवढ्या नॉर्मल त्वचेची गरज आहे त्याच साईजचे एक्सपांडर टाकले जाते.
एक्सपांडरची पूर्ण साईज वाढल्यानंतर ते एक्सपांडर काढून टाकले जाते. यासाठी साधारणपणे तीन ते चार महिन्याचा वेळ लागतो आणि नंतर ही वाढवलेली नॉर्मल चामडी गरज असलेल्या ठिकाणी वापरुन खराब असलेली किंवा रोग असलेली चामडी काढून टाकली जाते, त्याचा वापर म्हणजे टक्कल पडलेल्या भागावर केस आणण्यासाठीपण होतो. यात केस असलेला भाग मोठा करुन केस नसलेला भाग काढून टाकून त्याठिकाणी केस असलेला वाढवलेला भाग लावता येतो. एखाद्या रोगामुळे दृश्यभागावरील उदा. चेहऱ्यावरील चामडी खराब झालेली असेल किंवा चेहऱ्यावर खड्डा पडलेला असेल तो काढून या एक्सपांडरच्या साह्याने बाजूची चांगली चामडी मोठी करुन त्याठिकाणी वापरली जावू शकते. ब्रेस्ट रिकनस्ट्रक्शनमध्येपण या एक्सपांडरचा वापर केला जातो.

2. Hair transplant

A) FUT ( Follicular Unit Transplant ) : FUT ला Strip Method असेही म्हणतात. यामध्ये ज्या भागावर केस आहेत, म्हणजे डोक्याच्या पाठीमागील बाजूस केस असतात आणि समोरील बाजूस टक्कल पडते. या अशा केसमध्ये डोक्याच्या पाठीमागील बाजूवरील ( ज्यावर चांगले केस आहेत) त्वचा १ से.मी. रुंद आणि जास्तीत जास्त १५ ते २० से.मी. लांब केसासह काढली जाते आणि (Micro Scope ) मायक्रोस्कोपच्या खाली एक किंवा दोन केसाचे रुट असलेले युनीट वेगवेगळे केले जातात आणि मग हे एक-एक केलेले युनीट टक्कल पडलेल्या भागावर छोटे-छोटे छेद करुन त्यात बसवले जातात.

B) FUE ( Follicular Unit Extraction ) : FUE मध्ये पंच किंवा मशीनच्या साह्याने एक एक हेअर युनीट काढले जाते ते मशीनमध्ये किंवा नॉर्मल सलाईनमध्ये जमा केले जाते आणि लगेचच टक्कल पडलेल्या भागावर छोटे-छोटे छेद करुन त्यावर लावले जाते. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व संयमाची गरज असणारी असते. एक-एक केसाचे मूळ वेगळे करणे आणि एक-एक केसाचे मूळ टक्कल पडलेल्या भागावर रोपन करणे ही अत्यंत जिकरीची सर्जरी (प्रक्रिया) आहे. साधारणपणे एका टीमला २००० ते २५०० केसाचे मूळ करण्यासाठी ६ ते १२ तास लागतात.

3. Fat graft

A) फॅट ग्राफ्ट (Fat graft) :
आपल्या शरीरातील चरबी काढून आपल्याच शरीरात गरज असलेल्या ठिकाणी टाकता येते त्यास ‘फॅट ग्राफ्ट’ किंवा ‘फॅट ट्रान्सफर’ असे म्हणतात. या सर्जरीचा उपयोग चेहऱ्यावरील खड्डे, सुरकुत्या, कपाळावरील सुरकुत्या, मानेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्यामुळे अधिक तरुण दिसण्यासाठी केला जातो. फॅट ग्राफ्टचे मुख्य फायदे म्हणजे आपल्याच शरीरातील चरबी काढून आपल्याच शरीरात टाकली जाते. त्यामुळे त्याला अॅलर्जी होत नाही. ही चरबी अनेक वर्ष टाकलेल्या ठिकाणी राहते. फॅट टाकल्यानंतर प्रत्येक रुग्णांमध्ये ही चरबी विरघळण्याचे प्रमाण कमी – जास्त असते. फॅट ग्राफ्ट टाकलेल्या ठिकाणी जर विरघळलाच तर आपणास पुन्हा त्याठिकाणी फॅट टाकता येते. शरीरामध्ये ज्या ठिकाणी जास्त फॅट असते अशा ठिकाणची फॅट भूल देवूनच (जनरल अनेस्थेशिया) काढली जाते. या काढलेल्या फॅटचे व्यवस्थित प्रोसेसिंग करुन शरीरावर ज्या ठिकाणी खड्डा आहे तेथे टाकता येते. बऱ्याचवेळा चेहऱ्याचा एक भाग जन्मत: लहान असतो किंवा काही आजाराने तो लहान होतो अशा ठिकाणी चरबी भरुन तो भाग पूर्ववत करता येतो. काही आजारामुळे किंवा शस्त्रक्रियेमुळे शरीरावर खड्डा पडला असेल तर तोही चरबी भरुन पूर्ववत करता येतो. मुरुमामुळे पडलेले खड्डे अथवा व्रण या सर्जरीने चांगले करता येतात. ब्रेस्ट अगुमेंटेशनसाठी सुद्धा फॅट ग्राफ्टींग केली जाते.

4. Giant hairy nevus

यामध्ये शरीरावर काळा उंचवटा व त्यामध्ये केस असतात. हे lesion पूर्ण शरीरावर येवू शकतात. खूप मोठ्या प्रमाणात येते त्याला Giant hairy Nevus असे म्हणतात. छोटे असताना ते काढून त्यावर Primary Clouser करता येते पण ते खूप मोठे असतील तर Excision करुन त्यावर त्वचारोपन किंवा Flap Cover केले जाते.

5. Lip reduction / lip augmentation

बऱ्याचवेळा नैसर्गिकरित्या किंवा काही कारणाने ओठाचे आकार लहान मोठे होतात. अशा वेळी लहान ओठाचा आकार मोठा करण्यासाठी, ‘डर्मल ग्राफ्ट’ किंवा ‘फॅट ग्राफ्टचा’ वापर केला जातो आणि ओठाची साईज वाढविली जाते. जास्त असलेला ओठाचा आकार सर्जरीने कमी करता येतो.

6. Keloids

हा एक त्वचेतील कॉलेजीनचा आजार आहे. यामध्ये मार लागला, Operation ची जखम झाली असेल तेव्हा चामडीवर मोठ्या गाठी येतात आणि अशा गाठी खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतात. यावरील उपचार अत्यंत अवघड असतो यामध्ये मोठी झालेली गाठ काढणे त्यानंतर Steroid चे इंजेक्शन देणे विशिष्ट प्रकारचे मलम लावणे व प्रेशर गारमेंट वापरणे अशा प्रकारचे ईलाज केले जावू शकतात. तरीसुध्दा ह्या गाठी परत येण्याची शक्यता अधिक असते. बाह्यकर्णावर येणाऱ्या अशा प्रकारच्या गाठी परत येण्याची शक्यता जरा कमी असते गाठी लहान असतील तर फक्त Steroid च्या इंजेक्शननेसुध्दा सर्जरी न करता कमी होवू शकतात.

7. Dermabrasion

8. Scar revision