Hand Surgery

1. Synductyly

हात व पायाची बोटे चिकटण्याचे अनेक प्रकार असतात. त्यात दोन बोटे एकत्र चिकटणे किंवा तीन, चार किंवा पाचही बोटे एकत्र चिकटलेली असतात ते पूर्णपणे किंवा थोडेसे चिकटलेली असतात. तसेच बोटाची हाडे, ते पण पूर्णत: किंवा थोड्या प्रमाणात चिकटलेली असतात. अशा प्रकारच्या व्यंगावर सर्जरी ही साधारणपणे सहा महिने वय असताना करण्यात यावी. कारण, चिकटलेल्या बोटांची जेंव्हा वाढ होत असते तेंव्हा हाताची बोटे कमी- जास्त प्रमाणात वाढतात व त्यामुळे ती पुढे वाकडी होऊ शकतात आणि ते व्यंग कायमस्वरुपी राहू शकते. म्हणून, ही सर्जरी सहा महिन्यापेक्षा कमी वयात करण्यात यावी. म्हणजे, बोटांची पुढील वाढ नॉर्मल होवू शकते. जेंव्हा सर्वच बोटे जुळलेली असतात किंवा दोन पेक्षा अधिक बोटे जुळलेले असतात तेंव्हा सर्जरी टप्या-टप्यात केली जाते. फक्त दोनच बोटे जुळलेली असतील तर सर्जरी एकच टप्यात पूर्ण होऊ शकते.

2. Polydactyly

हात व पायांना पाच पेक्षा अधिक बोटे असण्याचे अनेक प्रकार असतात. साधी फक्त त्वचेवर लटकलेली बोटे किंवा पूर्ण हाडासह नॉर्मल बोटासारखी बोटे असे प्रकार यात मोडतात. कधी – कधी एकाच हाडावर दोन बोटे असेही येतात. हे जास्तीची असलेली बोटे सर्जरी करुन काढता येतात. या व्यंगावरसुद्धा सहा महिन्यापर्यंत सर्जरी करावी. या जास्तीच्या बोटामुळे बाकीच्या बोटामध्ये व्यंग निर्माण होते. ती वाकडे किंवा अयोग्य दिशेने वाढतात. म्हणून जास्तीची बोटे लवकरात लवकर काढणे जरुरीचे असते…

3. Hand injury

अनेक कारणांनी बोटांना जखमा होतात मानवी शरीरात सर्वात जास्त जखमा होणारा भाग म्हणजे हाताची बोटे . वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मशीनबरोबर काम करताना तसेच स्वयंपाक घरात काम करताना बोटांना जखमा होत असतात. शेतात, कारखान्यात, कन्स्ट्रक्शनवर काम करताना ह्या जखमा छोटी चामडी निघण्यापासून ते पूर्ण बोटे कापली जाण्यापर्यंत असू शकतात ह्या जखमांमध्ये, बोटावरची पूर्ण चामडी निघून जावू शकते बोटांची कामे करणाऱ्या नसा, रक्तवाहिन्या व चेतातंतू हे पण कापली जावू शकतात, अनेकवेळा हाडांचे फ्रॅक्चर्स होतात. हाताची बोटे हे मानवाच्या कार्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे आणि यालाच अशा मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या तर तो माणूस अनेक कार्यापासून दूर राहू शकतो. म्हणून या जखमांवरती योग्य वेळेत योग्य उपचार होणे जरुरीचे असते. प्लास्टीक सर्जरीमध्ये Hand Surgury ही एक स्वतंत्र ब्रँच निर्माण झाली आहे. यामध्ये Hand रिकन्स्ट्रक्शन हा अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. ह्या सगळ्या प्रकारच्या फिंगर इंज्युरीज योग्य त्या उपचाराने दुरुस्त केल्यानंतर हाताचे कार्य पूर्ववत आणता येते. यामध्ये Flap cover, Tendon Repair, Neurovascular bundle Repair and Fracture Fixation महत्वाचे असते.

4. Finger injury

6. Tendon injury

8. Groin flap

9. Posterior interosseous artery flap