Cosmetic Surgery

कॉस्मेटीक सर्जरी म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त सुंदर करणे. कॉस्मेटीक सर्जरीविषयीची संकल्पना म्हणजे ही सर्जरी म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचीच शाखा. तिकडे सर्वसाधारण कुटूंबातील मंडळी जाऊच शकत नाहीत. चित्रपट सृष्टीतील नट-नट्या, मॉडेल्स ही सर्जरी करून घेतात असे सर्वसामान्यांचे म्हणणे असते. आम्ही लातूरमध्ये हे युनीट सुरु करताना प्लास्टीक सर्जरी ही श्रीमंतांची ब्रँच गरीबापर्यंत घेऊन जाण्याच्या ध्येयानेच सुरु केले होते. महानगरामध्ये फाईव्हस्टार हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी करून घेणाऱ्याचे प्रमाण आणि कारणे वेगळी असतात ; पण लातूरमध्ये सर्जरीसाठी येणाऱ्या मंडळींची कारणे वेगळी असतात. येथे लोक मुलींची लग्न होत नाहीत या मुख्य कारणासाठी येत असतात. सामाजिक बांधिलकीतून या गरजवंतावर त्यांना परवडेल अशा खर्चात आम्ही कॉस्मेटीक सर्जरी करून देतो.

सन २००० मध्ये आम्ही जेव्हा लातूरमध्ये प्रॅक्टीस सुरु केली तेव्हा कॉस्मेटीक सर्जरीविषयीची फारशी जागरुकता नव्हती. गेल्या सोळा वर्षामध्ये पेशन्ट टू पेशन्ट या विषयीची माहिती होत गेली आणि या सर्जरीसाठी रुग्णांचा प्रचंड ओघ वाढला. अगदी सामान्यातली सामान्य माणसे या सर्जरीसाठी येऊ लागली आहेत. मलाही त्यांना चांगले करून देण्यात प्रचंड आनंद वाटतो. या सर्जरीने त्यांच्या अडचणी दूर होतात, त्यांच्या मनातला न्यूनगंड निघून जातो. त्यांच्या मनातला आनंद आणि आम्हाला वाटणारा आनंद यातच खरे समाधान आहे. आई-वडील आपल्या मुलीला घेऊन आमच्याकडे येत असतात. त्यांची बोलण्याची पध्दत मनाला वेदना देणारी असते. ते म्हणतात, लहाने साहेब आपल्या मुलीचं लग्न करायचय, तिचे नाक चांगले दिसत नाही म्हणून तिला कोणी पसंत करत नाही. आपण साधारण माणसं तुमच्याकडे आम्ही आता खूप अपेक्षा घेऊन आलो आहोत. असे म्हणत-म्हणत त्यांचे डोळे भरलेले असतात; मलाही खूप त्रास होत असतो. मी विचार करतो की, या ठिकाणी आपली मुलगी किंवा बहीण असती तर आपण काय केले असते ? आणि या प्रश्नाच उत्तर माझ्या मनाला जे मिळते तसे मी करून देत असतो.

पुढे जेव्हा या मुलींचे लग्न जमतात तेव्हा आवर्जून लग्नाचे निमंत्रण घेऊन ही मंडळी माझ्याकडे येत असतात. मला खूप आनंद होतो, आपण प्लास्टीक सर्जन झाल्याचा सार्थ आनंद मनाला होतो. ह्या लोकांच्या भावनेतूनच खरं तर मी अशा सर्जरीमध्ये जास्त-जास्त गुंतत गेलो. आपल्या सर्जरीतील टेक्नीकमध्ये वेळोवेळी अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी जगभरातील तज्ञ, कॉस्मेटीक सर्जनला भेटलो. त्यामुळे आणखी रिझल्ट चांगले मिळायला लागले. चांगले झालेले पेशंट दुसऱ्या पेशंटला सांगू लागले आणि कॉस्मेटीक सर्जरी करणाऱ्या रुग्णांचा ओघ खूप वाढला.

1. Nose plastic surgery (Rhinoplasty)

या सर्जरीमध्ये नाक उंच करणे, थोडे लांब करणे, आकार लहान किंवा मोठा करणे, शेंडा काढणे, नाकाला योग्य आकार देणे, वाकडे नाक सरळ करणे आणि अशा अनेक प्रकारच्या सर्जरी या प्रकारात मोडतात. यासंदर्भात पेशंटचे काही नेहमीचे प्रश्न,
अ) या सर्जरीने व्रण पडणार का ?
ही सर्जरी नाकाच्या आतल्या बाजूने केली जाते. त्यामुळे नाकावर अजिबात व्रण पडत नाही. ‘ओपन ऱ्हायनोप्लास्टी’ या सर्जरीमध्ये अत्यंत बारीक व्रण असतात पण ते दिसत नाहीत, कारण ते फोल्डमध्ये जातात.
ब) तुम्ही नाकात प्लास्टीकचे काही बसवता का ?
आम्ही नाकात प्लास्टीकचे काही बसवत नाही. ज्याचे नाक उंच करायचे आहे, त्यांच्या नाकाच्या आतील हाड (सेप्टम), कानाचे हाड (कॉन्कल कार्टीलेज) किंवा छातीचे हाड (कोस्टल कार्टीलेज) वापरून नाकाची उंची किंवा लांबी वाढविण्यात येते. ९५ टक्के केसमध्ये आपल्याच शरीराचा कुर्च्या (कार्टीलेज) वापरुन सर्जरी केली जाते. कधी-कधी आपल्या शरीराचे हाड (कार्टीलेज) वापरायचे नसेल किंवा खूप जास्त कार्टिलेजची गरज भासत असेल आणि ते उपलब्ध नसेल तर सिलीकॉन नेझल इंम्प्लान्ट म्हणजे सिलीकॉन या मटेरियलचे इंम्प्लान्ट मिळतात ते कार्टिलेजसारखे असतात. त्यांचा वापर नाक उंच आणि लांब करण्यासाठी केला जातो; पण आम्ही ते अजिबात वापरत नाहीत.

2. White patches, birth mark removal

पांढरे चट्टे, बर्थ मार्क्स (जन्म खुणा) : शरीरावर पांढरे चट्टे पडण्यामागे अनेक कारणे असतात पण प्रमुख कारण म्हणजे पांढरा कोड. भाजल्यानंतर, मार लागल्यानंतरही असे चट्टे पडू शकतात. ‘मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट’ हा या चट्ट्यावरील पहिला ईलाज आहे. जेव्हा मेडिसीन वापरुन ते कमीच होत नाहीत आणि आहे तेवढेच राहतात. वाढत पण नाहीत (स्टेबल पॅचेस) म्हणजे तीन वर्ष वाढले नाही आणि कमीही झाले नाहीत अशा पांढऱ्या चट्ट्यावर प्लास्टीक सर्जरी करून ते पूर्णपणे बरे करता येतात. यामध्ये पांढऱ्या भागावरील त्वचेचे पांढरे पडदे मशिनने काढले जातात आणि त्यावर दुसरीकडील चामडी काढून बसवली जाते. नवीन लावलेल्या चामडीचा रंग वेगळा दिसतो. पण हे प्रमाण वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगळे आहे. हे मॅच होण्यासाठी तीन महिन्यापासून एक वर्षापर्यंतचा कालावधी लागतो.

3. Liposuction

4. Lipectomy

इलेक्ट्रीक असिस्टेड लायपोसक्शन मशिनने काढलेली चरबी ४० वर्षाहून अधिक वय आणि (Lax skin) खाली लोंबणारी बेली (पोट) असे असेल तर फक्त लायपोसक्शन करून चालत नाही; त्याचबरोबर लॅक्स असलेला पोटाचा भाग खालच्या साईडने कट करून काढला जातो त्याला ‘लायपेक्टॉमी’ असे म्हणतात.

5. Mammary augmentation

या सर्जरीमध्ये स्तनाचा आकार वाढवला जातो. त्यासाठी ब्रेस्ट इंम्प्लान्ट, फॅट ग्राफ्ट, मसल ट्रान्सफरचा वापर केला जातो. कॉमनली ब्रेस्ट इंम्प्लान्ट वापरुन स्तनाचा आकार वाढवला जातो. हे इंम्प्लान्ट वेगवेगळ्या आकाराचे व प्रकारचे असतात. हे इम्प्लांट सिलीकॉन ह्या मटेरियलचे बनविलेले असते; ते टेक्सराईज असतात; म्हणजे नॉर्मल स्तनासारखा त्यांना फिल असतो. ही सर्जरीसुध्दा महानगरामध्ये व फाईव्हस्टार हॉस्पिटलमध्ये करत असतात. पण आमच्याकडेही ही सर्जरी मोठ्या प्रमाणात केली जाते. पण त्याची कारणे वेगवेगळी असतात. स्तनाची वाढ न होणे किंवा त्याला आजार असणे अशा केसमध्ये आम्ही ही सर्जरी करून देऊन त्या रुग्णाला पुढील जीवन जगण्याची शक्ती देतो.
या मध्ये स्तनाच्या खालच्या बाजूला छेद घेवून आत पोकळी (स्तनाच्या खाली) तयार करून त्यात हे इंम्प्लान्ट बसविले जाते. याच्या अनेक पद्धती असतात, या मध्ये स्नायूच्या खाली किंवा स्तन ग्रंथीच्या खाली इंम्प्लान्ट बसविता येते. या छेदाचा व्रण फोल्डमध्ये जात असल्याने दिसत नाही.

6. Mammary reduction

7. Gynecomastia

गायन्याकोमॅस्टीया म्हणजे पुरुषांमध्ये स्तनांची अनावश्यक वाढ होणे. शरिरातील हार्मोन्सच्या असमतोलामुळे अशी वाढ होऊ शकते. वयाच्या १८ वर्षांनंतरही ही वाढ असेलच तर ती चांगली दिसत नाही म्हणून ही काढून टाकण्याची इच्छा व्यक्त केली जाते. लायपोसक्शन आणि सर्जरीनेही ही अनावश्यक वाढ काढून टाकता येते, त्यानंतर ती पुन्हा वाढत नाही.

8.Laser treatment & Beauty spot

9. Beauty spot

या सर्जरीमध्ये नाक उंच करणे, थोडे लांब करणे, आकार लहान किंवा मोठा करणे, शेंडा काढणे, नाकाला योग्य आकार देणे, वाकडे नाक सरळ करणे आणि अशा अनेक प्रकारच्या सर्जरी या प्रकारात मोडतात. सर्जरी पूर्वी सर्जरी नंतर सर्जरी पूर्वी सर्जरी नंतर 17 04 सर्जरी नंतर सर्जरी पूर्वी सर्जरी पूर्वी सर्जरी नंतर