Cleft Care Centre

लहाने हॉस्पिटल, लातूर व स्माईल ट्रेन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अठरा वर्षापासून ‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या जन्मजात व्यंगावर वर्षभर मोफत
प्लास्टीक सर्जरी उपक्रम लहाने हॉस्पिटल, लातूर येथे राबवला जातो. या उपक्रमात गेल्या अठरा वर्षात ९५१५ मोफत सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
‘दुभंगलेले ओठ व टाळू’ हा एक सर्वसामान्य जन्मदोष आहे. भारत देशात प्रत्येकी ७०० मुलांमध्ये एक मूल हा दोष घेऊन जन्माला येते. म्हणजे दरवर्षी भारत देशात ४०,००० (चाळीस हजार) मुलं असे व्यंग घेऊन जन्माला येतात. सध्या आपल्या देशात पाच लाख मुलं सर्जरीविना हे व्यंग घेऊन जगत आहेत.
दुभंगलेले ओठ असणारे मुलं खूप विद्रूप दिसतात. त्यामुळे ते शाळेत जात नाहीत, इतर मुलात मिसळत नाहीत, समाजात बाहेर निघत नाहीत, दुभंगलेल्या टाळूच्या मुलांना व्यवस्थित बोलता येत नाही, मोठेपणी त्यांची लग्न जुळत नाहीत व त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. असे मूल जेंव्हा जन्माला येते तेंव्हा त्यांच्या आई-वडिलांची अवस्था आपण विचार करण्यापलीकडे असते.
या जन्मदोषाचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. पण काही कारणे सांगता येतील त्यात लवकर लग्न होणे, गरोदरपणात योग्य काळजी न घेणे, व्हायरल इन्फेक्शन, काही जीवनसत्वांचा अभाव (फोलिक ॲसिड आणि विटॅमिन बी १२) गुणसूत्र दोष अशी अनेक कारणे ग्राह्य धरली जातात.
हा दोष योग्य वयात योग्य तज्ञांकडून सर्जरीनी पूर्णपणे दुरुस्त होतो. पण या सर्जरीवरील खर्च बऱ्याच लोकांना परवडत नसल्यामुळे ही सर्जरी

ऑपरेशन पूर्वी ऑपरेशन नंतर ऑपरेशन पूर्वी ऑपरेशन नंतर करून घेतली जात नाही. अशा रुग्णांच्या पालकांकडून या सर्जरी विषयीच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे निदर्शनास आले की, ९०% लोकांना या सर्जरीचा खर्च परवडत नाही, ९२% लोकांना या व्यंगावर सर्जरी केंव्हा करावी हेच माहीत नाही, ८०% लोकांचे म्हणणे हे आहे की या सर्जरीसाठी ते दुरच्या मोठ्या शहरात जाऊ शकत नाहीत.
या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून हे व्यंग दुरुस्त करायचे असेल तर सर्जरी योग्य वेळी व योग्य तज्ञांकडून मोफत झाल्या पाहिजेत. तसेच ग्रामीण भागातील लोकांना परवडेल अशा ठिकाणी या सर्जरीची सोय झाली पाहिजे.

 

दुभंगलेले ओठ व टाळू म्हणजे काय ? हा एक सर्वसामान्य जन्मदोष आहे. हा देवाचा शाप किंवा अपशकून नाही किंवा ग्रहणात काही कापल्याने हा दोष होत नाही. हा दरवर्षी हजारो निरागस बाळांमध्ये आढळतो. आनंदाची बाब म्हणजे दुभंगलेले ओठ व टाळू हे दोष पूर्णपणे बरे करता येऊ शकतात व हे दोष असणारे मूल अगदी इतर मुलांसारखे चांगले दिसू शकते, बोलू शकते यासाठी या दोषावर योग्य वेळी प्लास्टीक सर्जरी करून घेणे जरुरी असते. दुभंगलेले ओठ : दुभंगलेले ओठ एक बाजू किंवा दोन्ही बाजूस असू शकते तसेच ते पूर्ण किंवा अपूर्णही असते. असा दोष असणारे मूल खूप विद्रूप दिसते. अशा बाळाचे पालक खूप चिंतेत असतात.
दुभंगलेली टाळू : यामध्ये टाळू पूर्ण किंवा अपूर्ण फाटलेली असते. असा दोष असणाऱ्या बाळांना व्यवस्थित बोलता येत नाही. त्यांना आईच्या अंगावरचे दूध पाजता येत नाही, खाताना त्रास होतो. दूध किंवा पाणी पिताना नाकातून बाहेर येते, बऱ्याच वेळा निमोनिया (फुफ्फुसाचा आजार) होतो, बाळाचे वजन वाढत नाही, दात वेडीवाकडे येतात. सर्जरी पूर्वी काय काळजी घ्यावी? फक्त दुभंगलेले ओठ असणाऱ्या बालकांना आईच्या अंगावरचे दूध अगदी इतर चांगल्या मुलांसारखे देता येते. मात्र दुभंगलेली टाळू असणाऱ्या बालकांना आईचे दूध छातीला लावून पाजताना काळजी घ्यावी. तसेच, अशा रुग्णांना बाटलीनेही दूध पाजवू नये. यामुळे फुफ्फुसाचे आजार होतात. अशा बालकांना वाटी व चमच्याने दूध पाजावे. शक्यतो आईचे अंगावरचे दूध वाटीत काढून तेच चमच्याने पाजावे. पाजताना काळजी घेणे जरूरीचे असते. बाळाला उभे धरून पाजावे, आईने बसूनच दूध पाजावे (झोपून पाजू नये).
सर्जरी केंव्हा करावी ? दुभंगलेल्या ओठावरील सर्जरी तीन ते सहा महिन्यात व कमीत कमी ५ किलो वजन असताना व दुभंगलेल्या टाळूवरील सर्जरी एक वर्षे ते दीड वर्ष वय व कमीत कमी १० किलो वजन असताना करून घ्यावी म्हणजे रिझल्ट खूप चांगले मिळतात. ज्या रुग्णांवर योग्य वयात सर्जरी झाली नाही त्यांची कोणत्याही वयात सर्जरी करता येते पण रिझल्ट त्याच प्रमाणात मिळतात.
सर्जरीचा खर्च किती येतो ? सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे लहाने हॉस्पिटल (लातूर) व स्माईल ट्रेन (अमेरिका) यांच्या संयुक्त विद्यमाने दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मदोषावर लहाने हॉस्पिटल, लातूर येथे वर्षभर पूर्णपणे मोफत प्लास्टीक सर्जरी उपक्रम राबविला जातो आहे.
अशा रुग्णांनी केंव्हा संपर्क साधावा ? अशा रुग्णांना तपासून मोफत सर्जरीसाठी तारखा दिल्या जातात. कोणत्याही दिवशी आपण आमच्या रुग्णालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत तपासणीसाठी येऊ शकता. (रविवार सोडून) संपर्काचा पत्ता : लहाने हॉस्पिटल, दिनानाथ नगर, सावेवाडी, लातूर. फोन : (०२३८२) २५४४०६, २५८८८०.

Our Contacts

Get In Touch

We, here at Lahane Hospital constitute a fully devoted team ever ready for a new challenge.

VISIT US

Dinanath Nagar Savewadi, Latur, Maharashtra 413531

EMAIL US

vlahane@gmail.com

CALL US

(02382)254406, 258880

FOLLOW US

Opening Hours

Visit Our Hospital

Lahane Hospital near Diwanji Function Hall, Dinanath Nagar Savewadi has a wide range of products and / or services to cater to the varied requirements of their customers. The staff at this establishment are courteous and prompt at providing any assistance. They readily answer any queries or questions that you may have. Pay for the product or service with ease by using any of the available modes of payment, such as Cash. This establishment is functional from 00:00 – 23:59.

Monday – Friday

Saturday

Sunday