लहाने प्लास्टीक आणि कॉस्मँटीक सर्जरी सेंटर व डेंटल क्लिनिकचे उद्घाटन सोहळा
या प्रसंगी आ. दिलीपरावजी देशमुख म्हणाले…. डॉ. लहानेसाहेब आपण रुग्णांना देव मानून सेवा करीत आहात, अत्यंत लहान वयात आपण सन्मार्गावर चालत आहात. किती कौतुक करावं आपलं, त्यापेक्षा आम्हाला आपला एखादा गुण घेता आला तर आमच्यापेक्षा भाग्यवान आम्हीच. या शिवारात अनेक प्रकारची झाडे आहेत पण तुम्ही लावलेलं (डॉ. लहाने यांच्या आई-वडिलांना उद्देशून) हे चंदनाचं झाड सर्वांना […]
‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या जन्मजात व्यंगावर लहाने हॉस्पिटल व स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर मोफत उपचार
‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या जन्मजात व्यंगावर लहाने हॉस्पिटल व स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर मोफत उपक्रम डिसेंबर २००४ मध्ये सुरू झाला. पहिल्या वर्षभरात (डिसेंबर २००४ ते डिसेंबर २००५) ‘दुभंगलेले ओठ व टाळू ́ या व्यंगाच्या ७३५ रुग्णांवर सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्या. या उपक्रमाची माहिती गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावी व हे व्यंग पूर्णपणे दुरुस्त होऊ […]
उद्घाटन सोहळा : २४ ऑक्टोबर २००४
२४ ऑक्टोबर २००४ रोजी साळेवाडी, लातूर येथील नवीन स्वतंत्र बिल्डींगमध्ये लहाने हॉस्पिटलचे स्थलांतर झाले. येथे २५ बेडची सुविधा असलेले हे हॉस्पिटल अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आले होते या नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन जागतिक प्लास्टिक सर्जन असोसिएशनचे अध्यक्ष व माझे गुरु सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.बेहमन डावर सर यांच्या शुभहस्ते व प्राचार्य श्री.अनिरुद्ध जाधव सर, लातूर येथील शासकीय वैद्यकीय […]