बर्न केअर सेंटर (जळीत रुग्ण उपचार केंद्र)
यामध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र खोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये सेंट्रल ऑक्सीजन, मॉनीटर्स, एअर स्टरलायझर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय करण्यात आलेली आहे. कांही रुम्समध्ये एअर कंडीशनरची सोय करण्यात आली आहे. याच माळ्यावर जळीत रुग्णांसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटरची सोय करण्यात आलेली आहे. रुग्णांना इन्फेक्शन होवू नये म्हणून हा विभाग व्हीजीटर्ससाठी रेस्ट्रीक्टेड करण्यात आलेला आहे. नातेवाईकांना रुग्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने प्रमुख डॉक्टरांच्या कन्सल्टींग रुममध्ये किंवा स्वागतकक्षाच्या कॉम्प्युटरवर पाहता येईल अशी सोय करण्यात आलेली आहे. जळीत रुग्ण उपचारप्रणाली मध्ये जसे-जसे बदल घडत आहेत त्या बदलांना अनुसरुन या सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे.
प्रथमोपचार म्हणून भाजलेल्या जखमेवर काय लावावे ?
खरे म्हणजे भाजल्या-भाजल्या ताबडतोब आग कमी होईपर्यंत त्यावर पाणी टाकणे हाच महत्त्वाचा खरा प्रथमोपचार आहे. शक्य असेल तर Silver Salfadizine असलेला मलम त्या जखमेवर लावता येतो.
अधोरी पद्धत वापरु नका
बऱ्याच वेळा पोळलेल्या भागावर फोड येवू नये या चुकीच्या कल्पनेतून मिरची पावडर लावली जाते. हे अत्यंत चूकीचे आहे. असे कृत्य करु नये ज्या भागावर भाजले आहे, त्याच भागावर मिरची पावडर लावली तर काय होइल याचा विचार करा. काहीजण पोळलेल्या भागावर मेहंदी, टूथपेस्ट, शाई, शेण, झाडाची साल असे वाट्टेल ते लावतात.
मेहंदी आणि टूथपेस्ट या दोन्हीमध्ये केमिकल असते. पोळलेल्या भागावर हे लावल्यानंतर ती जखम खराब होते. शेण व झाडाची साल भाजलेल्या भागावर लावल्याने त्याठिकाणची आग कमी होते असा अनेकांचा समज आहे. परंतू, यामुळे इन्फेक्शन होते व ती जखम जास्त खराब होते. यामुळे असले अघोरी ईलाज करु नयेत. फक्त पोळलेल्या भागावर पाणी टाकावे.
जळीत रुग्ण उपचार
जळीत रुग्ण उपचार प्रणाली ही अत्यंत गुंतागुंतीची, किचकट व कठीण समजली जाते. या उपचारामध्ये केंव्हाही गुंतागुंत निर्माण होवू शकते. फुफ्फुसाला ईजा होवून फुफ्फुस खराब होणे, किडनीवर परिणाम होवून किडनी खराब होणे, इन्फेक्शन होवून सर्वच महत्त्वाचे ऑर्गन खराब होणे अशा गुंतागुंती गंभीर व अतिगंभीर भाजलेल्या रुग्णांमध्ये निर्माण होवू शकतात.
गेल्या 16 वर्षापासून लातूरमध्ये आम्ही जळीत उपचार केंद्र चालवतो, या केंद्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक अतिगंभीर रुग्णांना जीवनदान देण्यात आमच्या या केंद्राच्या टीमला यश आले आहे.
भाजल्यानंतर प्राथमिक उपचार काय करावेत ?
जेंव्हा आग लागलेली असते ती आग पाणी टाकूनच विझवावी हा सर्वात महत्त्वाचा गुणकारी उपचार आहे. बऱ्याच वेळा माणसाच्या शरीराला लागलेली आग त्याच्यावर ब्लँकेट, सतरंजी किंवा इतर कपडे लपेटून विझवली जाते. ही पद्धत पूर्णपणे चुकीची असून धोकादायक आहे. जेंव्हा आग लागते आणि ती विझविण्यासाठी त्यावर जर ब्लँकेट टाकले तर ब्लँकेटच्या आत होणारा धुर, ज्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड नावाचा अत्यंत विषारी वायू असतो हा वायू सरळ तोंडातून किंवा नाकातून फुफ्फुसात जातो आणि फुफ्फुसे निकामी होतात. फुफ्फुसाला ईजा झालेले रुग्ण वाचण्याची शक्यता फारच कमी असते.
म्हणून जेंव्हा केंव्हा माणसाच्या शरीराला आग लागलेली असते तेंव्हा त्यावर पाणी टाकूनच विझवावे. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू फुफ्फुसात जाण्याचा प्रश्नच येत नाही. अशा पद्धतीने आग विझविलेले रुग्ण चांगले होण्याची शक्यता दाट असते.
भाजलेल्या जखमेवर पाणी किती वेळ टाकावे ?
भाजलेला भाग (हात, पाय) जेंव्हा कमी प्रमाणात असतो तेंव्हा तो भाग वाहत्या पाण्याखाली धरावा. भाजलेल्या भागातील आग पूर्णपणे कमी होईपर्यंत तो पाण्यात बुडवून किंवा नळा खालीच धरुन ठेवावा.
Our Contacts
We, here at Lahane Hospital constitute a fully devoted team ever ready for a new challenge.
VISIT US
Dinanath Nagar Savewadi, Latur, Maharashtra 413531
EMAIL US
vlahane@gmail.com
Opening Hours
Lahane Hospital near Diwanji Function Hall, Dinanath Nagar Savewadi has a wide range of products and / or services to cater to the varied requirements of their customers. The staff at this establishment are courteous and prompt at providing any assistance. They readily answer any queries or questions that you may have. Pay for the product or service with ease by using any of the available modes of payment, such as Cash. This establishment is functional from 00:00 – 23:59.
श्री.पुंडलिकराव लहाने (पिताश्री)
सौ. अंजनाबाई लहाने (मातोश्री)
वै.ह.भ.प. विठ्ठल प्रसाद महाराज
(अध्यात्मिक गुरू)
डॉ.बी.एम.डावर
( प्लास्टिक सर्जरीचे गुरू)
Established in the year 2009, Lahane Hospital near Diwanji Function Hall, Dinanath Nagar Savewadi, Latur is a top player in the category Hospitals in the Latur. This well-known establishment acts as a one-stop destination servicing customers both local and from other parts of Latur.
Lahane Hospital Latur – Copyright © 2023 – All Right Reserved