‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या जन्मजात व्यंगावर लहाने हॉस्पिटल व स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर मोफत उपक्रम डिसेंबर २००४ मध्ये सुरू झाला. पहिल्या वर्षभरात (डिसेंबर २००४ ते डिसेंबर २००५) ‘दुभंगलेले ओठ व टाळू ́ या व्यंगाच्या ७३५ रुग्णांवर सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्या. या उपक्रमाची माहिती गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावी व हे व्यंग पूर्णपणे दुरुस्त होऊ शकते या विषयी जनजागरण व्हावे या हेतूने सन २००५ मध्ये सर्जरी केलेले रुग्ण, पालक व नवीन रुग्ण यांना एकत्र करून १० डिसेंबर २००५ रोजी मा. आ. दिलीपरावजी देशमुख, मा. डॉ. बी. एम. डावर, डॉ. ए. बी. सोलपुरे, डॉ. विठ्ठल लहाने, अॅड. व्यंकटराव बेद्रे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, श्री. नरेश पंड्या, श्री. यशवंतराव पाटील, डॉ. लहाने यांचे आई-वडील, डॉ. सौ. कल्पना लहाने, सौ. कल्पना शाह, डॉ. राजेश शाह, श्री. लितेश शाह, सौ. भव्या शाह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्ण पालक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व या व्यंगाविषयी समाजात जनजागरण होण्यास मोठी मदत झाली. ष्ठमाईल ट्रेलर अमेरिका व महाने हरि पहिला वर्धापनदिन ● संयुक्त कि लिले अ Papaya 2 ‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या व्यंगावरील वर्षभर मोफत प्लास्टीक सर्जरी उपक्रमास एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने आयोजित रुग्ण पालक मेळाव्याचे उद्घाटन करताना मा. आ. दिलीपरावजी देशमुख, मा. डॉ. बी. एम. डावर, डॉ. ए. बी. सोलपुरे, डॉ. विठ्ठल लहाने, कार्यक्रमास उपस्थित मान्यवर