२४ ऑक्टोबर २००४ रोजी साळेवाडी, लातूर येथील नवीन स्वतंत्र बिल्डींगमध्ये लहाने हॉस्पिटलचे स्थलांतर झाले. येथे २५ बेडची सुविधा असलेले हे हॉस्पिटल अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आले होते या नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन जागतिक प्लास्टिक सर्जन असोसिएशनचे अध्यक्ष व माझे गुरु सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.बेहमन डावर सर यांच्या शुभहस्ते व प्राचार्य श्री.अनिरुद्ध जाधव सर, लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत शिरोळे, लोकमत वृत्तपत्राचे मुख्य उपसंपादक श्री.जयप्रकाशजी दगडे, नगरसेवक श्री.मकरंदजी सावे यांच्या उपस्थितीत २४ ऑक्टोबर २००४ रोजी संपन्न झाले.याप्रसंगी डॉ. डावर सर म्हणाले… “प्लास्टिक सर्जरीची पदवी मुंबईमध्ये घेऊन लातूरमध्ये प्लास्टिक सर्जरीची सेवा उपलब्ध करून देण्याचे काम माझ्या विद्यार्थी डॉ.विठ्ठल लहाने यांनी केले आहे.तो करत असलेले काम सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.प्लास्टिक सर्जरी त्यांनी सर्वसामान्य पर्यंत पोहोचवली आहे. अनेक रुग्णांना पुनर्जन्म दिला आहे. त्याचे हे सर्व काम पाहून माझे मन भरून आले आहे. तो माझा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे.”